इचलकरंजी शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेल्या 40 दिवसांपासून बंद असल्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून महापालिका आरोग्यविषयक गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच प्रकल्पस्थळी पाहणी केली.पाहणी दरम्यान त्यांनी प्रकल्प व्यवस्थापकांशी चर्चा करून दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची नोंद असलेले रजिस्टर तपासले.त्यामध्ये दररोज सुमारे 130 ते 150 टन कचरा जमा होत आहे.