ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही देशातील मार्क्सवादी विचारसरणीशी संबंधित सर्वांत जुनी विद्यार्थी संघटना आहे. पोलिस या संघटनेच्या विद्यार्थ्यांना नक्षलवादी संबोधून त्रास देत असतील तर, त्यांनी आधी माओवाद व मार्क्सवाद यातील फरक समजून घ्यावा. यातील फरक पोलिस विभागाला माहित नसेल, तर आम्ही पोलिस विभागाचे समुपदेश करू. याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी व पोलिस पाटिलांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू. असा इशारा एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी 11 सप्टेंबर रोजी दु. 2 वा. दिला आहे.