पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अकोला महापालिकेत शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याची कार्यशाळा दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. उत्कृष्ट मूर्ती साकार करणाऱ्या गटांना उपायुक्त विजय पारतवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व गटांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. परीक्षक म्हणून महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. या वेळी शिक्षणा