गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत नाल्यांचे पाणी ओसंडून वाहत असून, यामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. बोरगाव मेघे येथील गणेश नगर भागात राहणाऱ्या पंकज मोहदुरे यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.खासदार अमर काळे यांनी मोहदुरे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाचे सांत्वन करत, या दुर्घटनेप्रती मनापासून शोक व्यक्त केला. प्रशासनाकडून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश