भंडारा तालुक्यातील ग्राम भिलेवाडा येथे ग्रामपंचायत कार्यालयच्या सभागृहामध्ये दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता दरम्यान स्व.गंगाई बांते बहुउद्देशीय विकास संस्था भिलेवाडा व डॉ.सौरभ रोकडे यांच्या प्राईम हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात समस्त भिलेवाडावासियांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला. त्यावेळी डॉ.सौरभ रोकडे, तेजस विनोद बांते अध्यक्ष गंगाई बहुउद्देशीय विकास संस्था भिलेवाडा, भुषण शेंडे...