कुंभोज येथील रयत शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सागर माने यांना अलीकडेच काहि कारणास्तव सेवेबाहेर करण्यात आले आहे.परिणामी ते गेल्यानंतर पालकात नाराजी व्यक्त होत आहे. सदर प्राचार्यांनी कुंभोज रयत शैक्षणिक संकुलात शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेबद्दल त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी संस्था परिसरातील ग्रामस्थ व पालकांनी आज सोमवार दि 25 ऑगस्ट रोजी दु 3 वाजता संस्थेकडे केली.