एका बादशाह नावाचा जुगार अड्ड्यावर शिवाजी नगर पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजेदरम्यान आनंद नगर घाटपुरी देवीचे मंदिरजवळ छापा टाकून १४ जणांना पकडले तर २ जण फरार झाले. त्याच्या ताब्यातून ३ लाख ४९ हजार ७७५ रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे . शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आनंद नगर घाटपुरी देवीचे मंदिरजवळ गुणवंता अर्जुन हिरडकार यांच्या घरामध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जणांना पकडले.