कोल्हापूर शहरातील फुलेवाडी येथील गंगाई लॉन परिसरात आज मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करून सराईत गुन्हेगार महेश राख याचा निर्घृण खून केला असून या हल्ल्यात विश्वजीत फाले हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.