गोंदिया जिल्हयातील ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाचे अनुषंगाने सध्या गोंदिया पोलीस दलाकडून धार्मिक स्थळ व इतर आस्थापनांवरील अनाधिकृतपणे लावण्यात आलेले भोगे, लाऊडस्पिकर इत्यादी स्वतःहून काढून टाकण्याबाबत पोलीस स्टेशन स्तरावर धार्मिक व इतर आस्थापनांचे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यांना धार्मिक स्थळ व इतर आस्थापनांवरील भोंगे, लाऊडस्पिकर इत्यादी काढण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश भोंगे लाऊडस्पीकर काढण्यात आले आहे.