चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने १७ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बारदान फाट्यावर घडली.नीलेश शिवाजी पाटील हा माही मनीष शर्मा हिच्यासमवेत मोटारसायकलीवरून गंगापूर गावाकडून आनंदवल्लीकडे जात होता.बारदान फाटा येथून सिग्नलवर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची मोटारसायकल स्लीप झाल्याने दोघे खाली पडले.त्यात शर्मा हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.