आज दिनांक 22 ऑगस्ट ला सकाळी आठ ते नऊ वाजता च्या दरम्यान, पिंपरी थुगाव येथील गावाला लागूनच असलेल्या शेत शिवारातील विहिरी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती चांदूरबाजार पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून, नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहीरीबाहेर काढून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर, मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार येथे पाठवण्यात आला. घटनेचा पुढील तपास चांदुर बाजार पोलिसांकडून सुरू आहे