Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: धपकी येथे तलवार व चाकू हातात घेवून गावात दहशत निर्माण करणाऱ्यास दहेगाव (गो.) पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Seloo, Wardha | Sep 12, 2025
हातात धारदार तलवार व चाकू घेऊन गावकऱ्यांना धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यास दहेगाव पोलिसांनी शस्त्रासह जेरबंद केले. ही घटना सेलू तालुक्यातील धपकी गावात ता. 11 सप्टेंबर गुरुवारला दुपारी 2 वाजताचे सुमारास घडली. आरोपीवर दुपारी 4 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. मयुर गुलाबराव गलांडे (वय 26) रा. धपकी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशी माहिती ता. 12 ला दहेगाव पोलिसांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us