श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी व भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे दि ६ सप्टेंबर रोजी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. दोघींवरही नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथे आज रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. बळीरामपुर येथील कृष्णा आंबटवार हे भोसरी येथे खाजगी कंपनीत नोकरीला असुन तो आपल्या पत्नीसह भोसरी येथे राहत होते. दि ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन पाहण्यासाठी कृष्णाची पत्नी प्रतिभा आंबटवार व त्यांची भाची का