भुसावळ शहरात सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुस्लिम बांधवांतर्फे जश्ने ईद-ए-मिलादच्या निमित्ताने भव्य जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला. हा जुलूस रजा टॉवरपासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गांवरून फिरत उर्दू शाळा क्रमांक ३ येथे विसर्जित करण्यात आला. या जुलूसमध्ये केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण शहरात एकतेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.