मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषण सुरू असून त्यामध्ये राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी कराड तालुक्यातून शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या रसद सुमारास रवाना करण्यात आली. कराड तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने आवाहन केल्यानुसार मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी मराठा बांधवांसाठी दुपारपासूनच शिवतीर्थावर अन्न साहित्य जमा करण्यात आले.