बोदवड तालुक्यात धोंडखेडा हे गाव आहे. या गावात अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून सरिता सुनसकर वय १८ व आनंद सुनसकर वय १३ या दोघांना सुनील सुरेश कोळी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.काठीने मारून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा बोदवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.