बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला एकलव्य संघटनेने तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हैदराबाद गॅझेटचा चुकीचा अर्थ लावून आरक्षणात घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. या मागणीला शिफारस करणाऱ्या आमदार-लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात आला. आरक्षणात फेरबदल किंवा बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला.