महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला एन.टी.ब. प्रवर्गातून वगळून एन.टी.सी. प्रवर्गात समाविष्ट करण्याचा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत, हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी एन.टी.ब. आरक्षण बचाव समितीने केली आहे. या समितीच्या वतीने साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना सोमवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2.23 वाजता निवेदन देण्यात आले आहे.या समितीचे म्हणणे आहे की, ठेलारी समाज भटक्या जीवनशैलीत अडकलेला