मालेगाव कॅम्प पोलिसांचा विशेष उपक्रम – कॅफेंची तपासणी, नियमभंग टाळण्याचे आदेश Anc : महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमधून कॅफेमध्ये तरुण-तरुणींच्या अश्लील वर्तनाच्या घटना समोर येत होत्या. मालेगाव शहरात असे प्रकार घडू नयेत यासाठी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास या मोहिमेत कॅम्प हद्दीतील सर्व कॅफेधारकांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.