जळगाव शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना शनिवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. हा तरुण आपल्या मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला होता. तब्बल ५ दिवसानंतर बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृतदेह सावखेडा शिवारात तरंगतांना गिरणा नदी पात्रात मिळून आला आहे.