गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद व येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. 27 ऑगस्ट रोज बुधवारला सकाळी 11.20 ते दुपारी 12.30 वा. सिहोरा येथे रूट मार्च काढण्यात आले. सदर रूट मार्च सिहोरा पोलीस ठाणे, बस स्टॉप चौक, गुजरी चौक, दुर्गा मंदिर चौक, मजीद चौक, बँक ऑफ इंडिया चौक या मार्गाने काढण्यात आले. पोलीस दलाच्या रूट मार्च द्वारे नागरिकांना येणाऱ्या सण व उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.