भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती समर्थित सहकार पॅनलने 21 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. यात राष्ट्रवादीचे 13, भाजपचे 3 व शिंदेसेनेचे 1 असे 17 संचालक निवडून आले. काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे 4 संचालक विजयी झाले. निवडणुकीतील 21 पैकी एकूण 17 जागांसह सुनील फुंडे यांनी बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व मिळवले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे हे विद्यमान खासदार प्रशांत पडोळे यांचा मोठ्या फरकाने पराभव करत निवडून आले.