रिद्धी सिद्धीचे दैवत मांगल्याचे प्रतीक विघ्नहर्ता श्री. गणरायाचे गणेश चतुर्थीला आगमन झाले असून अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या गाडगेनगर स्थित निवासस्थानी श्रींची विधिवत स्थापना आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आली आहे. दहादिवसीय गणेशोत्सवात यश खोडके व समस्त खोडके परिवार तल्लीन झाले असून आमदार महोदयांनी सर्व अमरावतीकरांना सुख -समाधान, समृद्धी व भरभराटीसाठी यावेळी श्रीगणरायाच्या चरणीनतमस्तक होऊन विश्वमांगल्याची मनोकामना केली आहे.