गणेश उत्सव हा जनताभिमुख व्हावा या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सन 2025 मध्ये आदर्श गणेश मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळातील युवक व युवतींना सामाजिक बांधिलकी परंपरा जोपासत व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्याच्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.