ऊसतोड कामगार पुरवण्याचं आमिष दाखवून एका मुकादमाने बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने वैराग पोलीस ठाण्यात मुकादमाविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. भीमा सज्जन राजगुरु (वय ३१, रा. ढोराळे, ता. बार्शी) यांची फसवणूक झाली असून याप्रकरणी अविनाश राठोड विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.