लोहारा येथील तहसील कार्यालयावर दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता लोहारा तालुक्यातील शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी व वाहनचालक यांनी शेतकरी कर्जमाफी करुन शेतकऱ्याना आधार द्यावा,गोवंश हत्या बंदी (सुधारित) कायदा २०१५ रद्द करणे बाबत तसेच तथाकथीत गोरक्षकाकडून होत असलेली अडवणूक व कायदा हातात घेवून चालवलेली लुटमार, अत्याचार ताबोडतोब बंद करावा या मागणीसाठी एकत्र येत लोहारा तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा कढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता.