पारोळा---तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीवरील बोरी मध्यम प्रकल्प हा पूर्ण भरला आहे. त्याच्या ओव्हरफ्लो मधून तालुक्यातीलच कंकराज लघु पाट तलावाचे पुनर्भरण होऊन कंकराज ल. पा. तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होऊ लागला आहे . पारोळा शहरासह असंख्य गावांची तहान भागवणारे बोरी धरण हे गेल्या दोन दिवसांपूर्वी १००% भरले.