जळकोट आणि नळदुर्ग मंडळातील ३६ गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच तहसीलदारांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शेतकरी बांधवांनी जागरूक राहून पंचनाम्याच्या कामावर लक्ष ठेवावे, अशी माहिती आमदार राणा पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी चार वाजता सोशल माध्यमातून बोलताना दिली आहे.