शहरातील जनता कपडा बाजारातील कण्हया ड्रेसेस समोरील चौकात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रचंड ट्राफिक जॅम झाल्याने अंबुलन्सलाही थांबावे लागले. एवढेच नव्हे तर पोलिसांची गाडीही या जॅममध्ये अडकली होती. परिस्थिती गंभीर होताच नागरिकांनी पुढाकार घेत ट्राफिक सुरळीत केली आणि अंबुलन्सला मार्ग मोकळा करून दिला. या चौकात वारंवार होणाऱ्या ट्राफिकमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने ट्राफिक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.