माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर ते श्री दत्त शिखर संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुडगंगा नाल्यावरील पुलाजवळ भाविकांची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरीकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कंबरे खालून मोडल्याची गंभीर घटना आज रविवार दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी ३:४० वाजता घडली आहे. मौजे जोडगव्हाण ता.मालेगाव जि.वाशिम येथील भाविक आपल्या घरची कार क्रमांक एमएच 26 बी एक्स 4991 द्वारे चालक चेतन गोवर्धन सोलव हे घरच्या मंडळींना घे