सेनगांव तालुक्यातील आजेगांव परिसरामध्ये सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिकांची वन्य प्राण्यांकडून प्रचंड नासाडी होत असल्यामुळे तात्काळ वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यातच खरीप हंगामातील सोयाबीन सह इतर पिकांची वन्यप्राणी प्रचंड नासाडी करत असल्यामुळे बंदोबस्त मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आली आहे.