कळंबा मध्यवर्ती कारागृह नजीकच्या एलआयसी कॉलनीतील मनोरमा नगरीत घरगुती गॅस पूरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून गॅस गळती होऊन भोजने कुटुंबियातील चौघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली होती. दरम्यान यातील जखमी शीतल अमर भोजने या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान आज सकाळी यातील जखमी अनंत भोजने यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे.