पारोळा तालुक्यातील दळवेल येथील एकनाथ चैत्राम पाटील व भुषण संजय पाटील यांच्या तीन म्हशी व एक गाय असे वीज वितरण कंपनीचे तार अचानक तुटल्यामुळे शॉक लागून मरण पावल्याची घटना घडली आहे. याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवले असता सदर वीज वितरण कंपनीच्या वायरमन व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन सदर मयत पशुधनाचे शववीच्छेदन केले.