– गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोला प्रवाशांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात विक्रमी प्रवासीसंख्या नोंदवली गेली असून महसुलातही मोठी वाढ झाली आहे. मिरवणुकीसाठी पुण्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली. वाहतुकीतील कोंडी आणि पार्किंगच्या समस्येमुळे अनेकांनी मेट्रोकडे मोर्चा वळवला. परिणामी दिवसभरात मेट्रोच्या डब्यांमध