माणगाववाडी येथील पार्वती फाउंड्रीमध्ये काम करणाऱ्या एका महिला कामगाराचा कामावर असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार,हेरले येथील रेखा आनंदा भादुरवाडे वय वर्ष 55 या महिला कामावर असताना तिला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली.यावेळी शेजारी काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांनी तात्काळ तिला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.