नागपूर शहरातील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे ऑपरेशन यू टर्न राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत 50 हून अधिक पालकांवर कार्यवाही करण्यात आली असून अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्याची परवानगी दिल्याबद्दल गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.