हदगाव ते वारंगा जाणारे रोडवर दि १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास यातील आरोपी मधुकर ठोके यांनी आपले ताब्यातील महिंद्रा बोलेरो पीकअप वाहन क्रमांक एमएच २९ बीई ८७९२ मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या दहा म्हैस जातीचे जनावरे कोंबुन वाहतूक करीत असताना पोलीसांना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी पोलीस काॅन्स्टेबल नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिरी आज करीत आहेत.