अलिबाग तालुक्यातील किहीम येथील समुद्रकिनारी फक्त श्रावणात दर्शन देणाऱ्या सागरेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी सकाळ पासून सायंकाळी उशिरापर्यंत शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.