देवगड कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांवर एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देवगड पोलिस ठाण्यातून शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता देण्यात आली.