तास शेती शिवारातील कपासीच्या शेतामध्ये पडून असलेल्या जिवंत विद्युत ताराच स्पर्शाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार मृत्यक शेतकरी दिवाकर कोल्हे हे त्याच्या कपासीच्या शेतामध्ये शेतीचे काम करण्यासाठी गेले होते.याच दरम्यान शेतामध्ये जमिनीवर पडून असलेल्या जिवंत विद्युत प्रवाहित ताराचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती विद्युत महावितरण कंपनीला दिली यासंबंधी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.