अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या अंजनगाव महामार्गावरील ग्राम पणज येथील पुरातन महालक्ष्मी मंदिराला उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी भेट दिली यावेळी त्यांनी महालक्ष्मी मंदिर येथे भेट देत महालक्ष्मी यात्रेतील चोख नियोजनाबाबत मंदिर समितीचे कौतुक केले यावेळी मंदिर समितीने उपविभागीय अधिकारी म्हणून लोणारकर यांचा सपत्निक सत्कार करत प्रशासनाने यात्रेसाठी केलेल्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले.