कर्जाचे हप्ते भरण्याबाबत सांगण्यासाठी पीडित महिलेला विविध नंबरवरून फोन करीत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली.पीडित महिलेने क्रेडिट केअर या फायनान्स कंपनीकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.त्याचा हप्ता दरमहा ५० हजार ४१७ रुपये होता.कर्ज घेतल्यापासून पीडिता नियमित हप्ते भरत होती;मात्र चार महिन्यांच्या कालावधीत काही कारणास्तव पीडितेला हप्ते भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे फोन द्वारे अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला.