कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 30 ऑगस्ट रोजी 18 संचालक पदा करता पार पडली, आज दि. 31 ऑगस्ट रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली,या निवडणुकीत कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या शिव शेतकरी विकास पॅनल 18 पैकी 17 जागेवर घवघवीत यश तर एका जागेवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.