शहरातील गौतम नगर परीसरात आधीच दोन मोबाईल टॉवर असताना आणखी एका टॉवरचे काम सुरु करण्यात आले आहे. याविरोधात अनेक निवेदने देऊनही नगरपरिषद कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना शिंदे गटातर्फे याविरोधात नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.सदर टॉवरचे बांधकाम रद्द न केल्यास याविरोधात आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऊपोषणकर्त्यांनी यावेळी दिला आहे.