समुद्रपुर:केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची मुंग, उडिद, सोयाबीन व तुर तर कापसाची खरेदी सिसीआय मार्फत करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच पिकविमा आणि शेतीविषयक अनुदान इत्यादी मिळण्यासाठी यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद आवश्यक असणार आहे.तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी ईपिक ॲपचे माध्यमातून १५ सप्टेंबर पर्यंत करून द्यावे असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे