मागील बारा दिवसांपूर्वी कर्जत मधून चोरीस गेलेली टॉयाटो कंपनीची इनोव्हा कार अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली होती. कर्जत पोलिसांनी तपास करून ही कार दोन चोरट्यांसह राजस्थान मध्ये पकडली. त्याच बरोबर ही कार चोरताना वापरलेली स्विफ्ट डिझायर कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे.कर्जत पोलिसांनी ही कामगिरी केली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.