वाघोलीतील फुलमळा रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे, त्यामुळे विद्यार्थी, महीला, ज्येष्ठ नागरीक आणि नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. रस्त्यामध्ये खड्डे आहेत, पाण्यामुळे ते दिसत नाहीत आणि यामुळे अनेक अपघात होत आहेत. पाण्याचा निचारा होण्यासाठी उपाययोजना करावी ते पाणी पावसाळी लाईनला जोडण्यात यावे जेणेकरून करून रस्त्यावर पाणी थांबणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही. अशी मागणी नागरीकांनी केली आहे.