औसा- औसा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दि. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या संततधार पावसासह अधून मधून झालेल्या मुसळधार पावसामुळे मूगपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.दरम्यान, तुरीची पिके उमरट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, सोयाबीन पिकावर येल्लो मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.