आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ठाणे घोडबंदर वाहिनीवर घाट रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम आणि रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढली असून वाहतूक संत गतीने सुरू आहे.तसेच सध्या एका लाईन वरून वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आव्हान वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.