सप्तश्रृंगी धनोजे कुणबी महिला ग्रुप चे वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज दि 7 सप्टेंबर ला 1 वाजता महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक लक्ष्मीनगर येथील धनोजे कुणबी समाज मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सीमा सुधाकर अडबाले, सप्तश्रृंगी ग्रुप च्या संयोजिका प्रा योगिता धांडे यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सीमा अडबाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अतिथींचे हस्ते अंगणवाडी ते पीजी पर्यंतच्या 30 शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.